Sanjay Raut : सोलापुरात संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक | पुढारी

Sanjay Raut : सोलापुरात संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक केल्याची घटना आज (दि.१०) सोलापुरात घडली.  Sanjay Raut

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वाहनावर बाळे (सोलापूर) येथे राणे समर्थक सागर शिंदे नावाच्या व्यक्तीने चप्पल फेकली. राऊत हे सोलापूरमधील बाळे येथे एका हाॅेलच्या उद्घाटनासाठी गेलेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर परत येत असताना महामार्गावरील ब्रिजवर थांबलेल्या शिंदे यांनी त्यांच्या वाहनावर चप्पल फेकली.

सागर शिंदे हे नारायण राणे समर्थक कार्यकर्ता असून, गेल्या अनेक दिवसापासून राऊत हे राणे, फडणवीस यांच्यावर आरोप करत असल्याच्या राग होता. तसेच मराठा मुक मोर्चावेळी राऊत यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. या रागातून चप्पल फेकल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा 

Back to top button