माझा आणि किर्तीकरांचा वाद पूर्णपणे संपला : रामदास कदम

माझा आणि किर्तीकरांचा वाद पूर्णपणे संपला : रामदास कदम

पुढारी ऑनलाईन डेस्क : गजानन किर्तीकर यांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. गजाभाऊ आणि माझ्यातील वाद पूर्णपणे संपलेला आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.

गेले काही दिवस शिवसेना-शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्यातील वाद चर्चेत आहे. आज या वादावर खुलासा केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "पक्षात मतभेद नको आहेत. किर्तीकरांसोबतचा माझा वाद संपलेला आहे.  मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांना तक्रार करायचीच असेल तर ती त्यांनी आमचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली पाहिजे".

ते पुढे म्हणाले की, मला संपवण्यासाठी प्रसिद्धीपत्रक काढणं हे अयोग्य आहे. कोणत्याही वादात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं याआधी ठरलेलं होतं. आम्ही दोघांनी पक्षात खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्यामुळे मला पक्षात मतभेद नको आहेत असं  कदम यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news