Maharashtra Politics News I…म्हणून मुख्यमंत्री पद गेलं; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला

…म्हणून मुख्यमंत्री पद गेलं; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Politics News
…म्हणून मुख्यमंत्री पद गेलं; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोलाMaharashtra Politics News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाशिकच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यूतांडवप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. यानंतर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी "जनतेवर आपत्ती ओढवलेली असतानाही घरातच बसून रहायला देवेंद्रजी तुमच्यासारखे आरामखुर्चीवाले राजकारणी थोडेच आहेत" असं म्हणत जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. (Maharashtra Politics News )

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. या परिस्थितीने राज्य हादरलं आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, ठाणे मृत्यूचा आकडा समोर आला आहे. यावर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी ते म्हणाले की,"करोना काळात जी यंत्रणा होती तीच आताही आहे. करोनात ज्यांनी माणसं वाचवली ती यंत्रणा आता नालायक कशी होऊ शकते? यांच धुसफूस सुरू आहे, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदासाठी मारामारी सुरू आहे." नांदेडमधील मृत्यूप्रकरणाला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Maharashtra Politics News : उद्धवजी, तुमच्या कार्यकाळात…

ठाकरे यांच्या टीकास्त्रानंतर चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट करत जोरदार प्रतित्यूर दिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की," उद्धवजी, तुमच्या कार्यकाळात आरोग्य विभागात मनुष्यबळाची टंचाई होती, हे कबूल करून बरं केलंत.

तुमच्या कारकिर्दीत घसरलेलं आरोग्यव्यवस्थेचं गाडं आम्ही रूळावर आणतो आहोत. आवश्यक निधीची तरतूद, पदभरती, नव्या रूग्णालयांची उभारणी, कार्यरत रूग्णालयांची क्षमतावाढ या मार्गांनी आम्ही राज्याची आरोग्ययंत्रणा बळकट करण्याचं काम करत आहोत. याच पत्रकार परिषदेत तुम्ही असंही म्हणालात, नागपूरमधील अतिवृष्टीनंतर मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी तिकडं फिरकले नाहीत.

पावसाने नागपूरकरांच्या डोळ्यांत आणलेले अश्रू पुसण्यासाठी, त्यांना सांत्वनाचा आधार देण्यासाठी आणि सरकारी मदतीतून त्यांचे संसार उभे करण्यासाठी देवेंद्रजी पायाला भिंगरी लावून शहरभर फिरत होते. पुरावे पाहिजे असतील तर सोशल मीडीयावर त्यांचे शेकडो व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील. जनतेवर आपत्ती ओढवलेली असतानाही घरातच बसून रहायला देवेंद्रजी तुमच्यासारखे आरामखुर्चीवाले राजकारणी थोडेच आहेत. संकट अस्मानी असो की सुलतानी! देवेंद्रजी पोहोचतातच जनतेने हाक द्यायच्या अगोदर !! आणखी एक तुम्ही म्हणालात की, मी काय करू आरोग्यव्यवस्थेची पाहणी करायला जाऊन. तुम्ही जाऊन या साहेब. जाऊन आल्यानंतरचे तुमचे सल्ले-टोमणे कदाचित आमच्या उपयोगी पडतील. घरात बसून दिलेले सल्ले तुमच्या लोकांनी तरी ऐकले काय…??मुख्यमंत्रीपद म्हणून तर गेलं ना !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news