दिल्लीच्या अदृश्य हाताने पक्ष आणि कुटुंब फोडले : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

दिल्लीच्या अदृश्य हाताने पक्ष आणि कुटुंब फोडले : खासदार सुप्रिया सुळे

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या अदृश्य हाताने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडला. हा हात पक्ष आणि कुटुंब फोडण्याचे पाप करीत आहे. महाराष्ट्राच्या विरोधात असलेल्या याच हाताने पाच वर्षे मुख्यमंत्री असलेल्याला उपमुख्यमंत्री पदी आणले व उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यात निम्मे वाटेकरी आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवार वादावर बोलतात. शेवटी या देशात लोकशाही आहे की नाही? मात्र, सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नाही या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. १) भाजपावर हल्लाबोल केला. पदाधिकारी बैठकीनंतर त्या बोलत होत्या.

बेरोजगारी, शेतकरी अशा कुठल्याही मुद्द्यावर बोलायला आपण तयार असल्याचे आव्हान त्यांनी दिले. माझा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. मात्र माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उर्फ भाईजी जेव्हापासून यासंदर्भात दावा करीत आहेत त्यावर या सदृश्य हाताने त्यांना कानात काही भविष्य तर सांगितले नाही ना, अशी शंका माझ्या मनात येत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 70 हजार कोटींचा आरोप भाजपने केला खरा असेल तर काय करायचे हे भाजपलाच माहिती आहे जर खोटा असेल तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे माफी मागावी याकडे सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात लक्ष वेधले. विरोधकांवरच 95 टक्के विरोधकांवर यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. इंडिया आघाडीला भविष्यात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळेल. पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत शंका घेण्याचे कारण नाही कधी काळी डॉ मनमोहन सिंग यांचे नाव पुढे आले त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटले मात्र ते सक्षम प्रधानमंत्री ठरले. हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी पुढे जाणार आहे याबाबत कुठलीही शंका नाही. वैयक्तिक संबंध वेगळे आणि वैचारिक लढाई वेगळी असे सांगत अजितदादांवर मात्र त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. पटेल यांनी केलेल्या आरोपा संदर्भात छेडले असता विदर्भात जे यश मिळाले ते प्रफुल्ल पटेल यांचे तर जे अपयश आहे ते सुप्रिया सुळे यांचे असे स्पष्ट केले. भाजपकडे एक वाशिंग मशीन अशी आहे की त्यात सगळे स्वच्छ होतात कंत्राटीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट भाजपच्या आमदारांना देण्यात आल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले असेही सांगितले. यावेळी महिला राष्ट्रवादी अध्यक्ष रोहिणी खडसे, सलील देशमुख, दुनेश्वर पेठे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Back to top button