

मुंबई : पुढारी वृत्तसेवा बेस्टच्या मालवणी डेपोत उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला आग लागली ही घटना आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार इलेक्ट्रिक बसला आग लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेस्टच्या ताफ्यातील टाटा मोटर्सची भाडे तत्वावरील बस क्रमांक MH-01-DR-2260 मालवणी डेपोत उभ्या असताना बसला अचानक आग लागली. बस रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेस्ट प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली.
हेही वाचा :