नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कारागृहातील कैद्यांना आता लवकरच आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळताच नागपूर मध्यवर्ती कारागृहसोबतच महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्यासाठी टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.