

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशात पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हासंबंधीचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्याने पक्ष नेमका कुणाचा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पंरतु, राष्ट्रवादीत दोन गट नाहीत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हावर दावा करणे दुर्दैवी आहे, अशी भूमिका पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगात स्पष्ट करण्यात आली आहे.