60 Tonnes of Gold | भारतात परत आणले ६० टन सोने

रिझर्व्ह बँकेमुळे देशांतर्गत तिजोरीतील प्रमाण ८४ टक्‍क्‍यांवर
60 Tonnes of Gold |
60 Tonnes of Gold | भारतात परत आणले ६० टन सोने
Published on: 
Updated on: 

मुंबई : विदेशातील तिजोर्‍यांमध्‍ये ठेवलेले सुमारे ६० हजार ८० किलो (६०.०८ टन) सोने रिझर्व्ह बँकेने प्रयत्‍न करून मार्च ते सप्टेंबर २०२६ या गेल्‍या सहा महिन्‍यांच्‍या कालावधीत भारतात परत आणले आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेच्‍या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी देशांतर्गत तिजोरीमध्ये ठेवलेल्या सोन्याचे प्रमाण वाढून सुमारे ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मार्चअखेर हे प्रमाण ७७.२३ टक्के होते.

रिझर्व्ह बँकेच्‍या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध सहामाही अहवालानुसार, ३० सप्टेंबर २०२६ अखेर भारताकडे ८८०.५२ टन सोन्याचा साठा होता. त्यापैकी ७४०.१३ टन सोने भारतातच ठेवलेले होते.

दरम्यान, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटस्‌ (बीआयएस) यांच्याकडे विदेशात ठेवलेल्या भारतीय सोन्याच्या साठ्यात घट झाली आहे. मार्च २०२६ मध्ये विदेशात १९७.६७ टन सोने होते. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण कमी होऊन १४०.३९ टनांवर आले.

जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि बदलती आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सोन्याचा अधिकाधिक साठा देशांतर्गत तिजोरीमध्ये ठेवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या धोरणाचाच एक भाग म्हणून परदेशात ठेवलेले सोने टप्प्याटप्प्याने भारतात आणले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.