मरिनड्राईव्ह परिसरातून ६० मोबाईल चोरीस

भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागत गर्दीवेळी घडला प्रकार: पोलीस ठाण्यात मात्र; गहाळ नोंद
Mumbai crowd For team india Welcome After Worldcup
भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागत गर्दीPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : टी-२० विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी नरिमन पॉईंट येथून काढलेल्या यात्रेवेळी मरिनड्राईव्ह परिसरातून सुमारे ६० मोबाईल चोरीचे प्रकार गुरुवारी रात्री घडले.मात्र; मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात या मोबाईलची नोंद ही गहाळ अशी आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी दुपारपासून क्रिकेट शाैकीन नरिमन पाॅईंट या मार्गावर गर्दी केली केली होती.यासाठी मुंबई,ठाणे,नवी मुंबईसह विविध भागातून क्रिकेट शाैकीन आले होते. वानखेडे स्टेडियम कडे जाणारा रस्ता खचाखच भरला होता. यात काही क्रिकेट शाैकीनांनी मोबाईलमधून सेल्फी तर छबी टिपल्या.नरिमन पाॅईंट परिसरात रात्री क्रिकेट संघाचे आगमन झाल्यावर चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत मोबाईलवर डल्ला मारला. एवढा पोलिसांचा बंदोबस्त असतानाही हा प्रकार कसा घडला,अशी विचारणा क्रिकेट शौकीनामूधून विचारला जात आहे.

Mumbai crowd For team india Welcome After Worldcup
आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे

दरम्यान, या गर्दीमुळे ६० मोबाईल गहाळ झाल्याची नोंद मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात शुक्रवारी झाली आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल म्हणाले,नरिमन पॉईंट येथे गर्दीवेळी अनेकजण मोबाईल मधून फोटो काढत होते तर शुटिंग करत होते. हे करत असताना अनेकांचे मोबाईल खाली पडले.त्यामुळे पोलीस दफ्तरी ६० मोबाईल गहाळ झाल्याची नोंद झाली आहे या प्रकरणाचा तपास करुन त्यापैकी तीन तक्रारदारांना मोबाईल परत केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news