अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची पुन्हा भेट; प्रफुल्ल पटेल म्हणाले... | पुढारी

अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची पुन्हा भेट; प्रफुल्ल पटेल म्हणाले...

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: पक्ष एकसंघ रहावा, या दिशेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचार करावा, अशी विनंती कालही आणि आजही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज (दि.१७) दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि आम्ही रविवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. काल सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बरेच आमदार उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आज शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत. हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. आणि प्रत्येक आमदारांनी त्यांचे आशिर्वाद घेतले, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

रविवारी शरद पवार यांनी जसे आमचे म्हणणे ऐकून घेतले, तसे आजही ऐकून घेतले. त्यांच्या मनात काय आहे, हे मी कसे सांगू शकतो. मात्र, आमचे म्हणणे ऐकून घेतले हेही आवर्जून प्रफुल पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button