कुर्ला; पुढारी वृत्तसेवा: राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीविरोधात मनसेने आज (दि.८) आंदोलन छेडले. मनसेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 'एक सही संतापाची' ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे. मुंबईच्या दादर विभागात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली.
या मोहिमेला मनसेचे नेते अमित ठाकरे, नितीन सरदेसाई यांनीदेखील उपस्थिती लावली. त्यांनी स्वाक्षरी करुन या मोहिमेला सुरुवात केली.
या ठिकाणी राज ठाकरे यांची राज्यातील राजकारणावरील भाषणे एलईडी स्क्रिनवर दाखवण्यात येत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यात येत आहेत. तर एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर सामान्य नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राज्यातील या राजकारणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा