Drawned Death : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू | पुढारी

Drawned Death : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

कोपरखैरणे; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईतील घणसोली येथील एन. एम. एम. टी .बस डेपो समोरील पाण्याच्या डबक्यात पोहण्यास उतरलेल्या एका १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तो आपला लहान भाऊ आणि एका मित्राच्या सोबत पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेला होता.

आयुष यादव असे मयत तरुणाचे नाव आहे. आयुष्य घनसोलीतील घरौदा गृहनिर्माण संस्थेत राहत होता. आज (दि. १, शनिवारी) बाराच्या सुमारास तो आपला लहान भाऊ आणि एका मित्राच्या समवेत पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडला. घणसोली एनएमएमटीच्या डेपो समोरील रस्त्याच्या बाहेर एका खड्ड्यात पावसाचे पाणी साठले होते. त्याच पाण्यात आयुष पोहण्यास उतरला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे काही लोक जमा आले. मात्र तोपर्यंत आयुष पाण्यात दिसेनासा झाला होता. दरम्यान उपस्थित काही लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलास या घटनेची माहिती दिली. दुपारी साडेतीन वाजता अग्निशमन दलास माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता आयुषचा मृत पावल्याचे आढळून आले. त्याला बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशी माहिती राबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एन. औटी यांनी दिली.

Back to top button