शिवशाही की निजामशाही? चित्रा वाघ यांनी ‘कू’वर सरकारला विचारला जाब | पुढारी

शिवशाही की निजामशाही? चित्रा वाघ यांनी 'कू'वर सरकारला विचारला जाब

मुंबई; पुढारी ऑनलाईन

चित्रा वाघ : पैठण तालुक्यात बुधवारी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणाबाबत थेट शिवसेनेच्या संजय राऊत यांना जाब विचारला आहे. ‘कू’वर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे, ‘संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांसाठी परजतेय… कदाचित उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्यापर्यंत औरंगाबादची महिला अत्याचाराची घटना पोचली नसेल…’

पैठण तालुक्यात तोंडोळी इथे बुधवारी २० ऑक्टोवर रोजी दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. यातली एक महिला आठ महिन्यांची गर्भवती तर दुसरी पंधरा दिवसांची बाळंतीण आहे. या दोन महिलांवर सात दरोडेखोरांनी निर्घृण बलात्कार केला.

या दोन शेतमजूर महिला कुटुंबासह बिहारहून कामाच्या शोधात महाराष्ट्रात आल्या होत्या. त्यांची दोन कुटुंबं तोंडोळी गावच्या शेतवस्तीवर राहत होती. याप्रकरणात पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

दरम्यान चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबांना भेट देत सांत्वन केले. यावेळीही त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, ‘आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय. ‘शिवशाही’चं वचन देणाऱ्यांनी ‘निजामशाही’ आणलीय.’

Back to top button