मुंबई : वांद्रे येथील नर्गिस दत्त रोडजवळील झोपडपट्‍टीला आग | पुढारी

मुंबई : वांद्रे येथील नर्गिस दत्त रोडजवळील झोपडपट्‍टीला आग

मुंबई : पुढारी वृत्तसेवा वांद्रे येथील नर्गिस दत्त रोडजवळील झोपडपट्टीला आज (बुधवार) पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सात ते आठ झोपड्या आणि एका मजल्याच्या इमारतीपर्यंत आग मर्यादित आहे. भाजपचे शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे की, वांद्रे नर्गिस दत्त नगर झोपडपट्टीत आग! अग्निशमन दल आणि पोलिस कामावर! पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी आवश्यक ते सर्व करत आहोत.

हेही वाचा :  

Back to top button