मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन | पुढारी

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा  तीन-चार दिवसांपूर्वीच विश्वनाथ महाडेश्वर गावावरून परतले होते. सोमवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं दुःखद निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत सर्वात उच्च शिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. एक विनम्र आणि अभ्यासू नेत्याच्या अचानक जाण्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

महाडेश्वरांचा अल्प परिचय

मुंबईतील प्रतिष्ठित रामनारायण रुईया महाविद्यालयातून विश्वनाथ महाडेश्वर यांनी पदवी घेतली होती. त्यानंतर वडाळा येथील बीपीसीए महाविद्यालयातून व्यावसायिका पदव्युत्तर पदवी घेतली. सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे ते माजी प्राचार्य होते. तीन वेळा नगरसेवक झालेले महाडेश्वर २००२ साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडणूक आले. २००३ मध्ये बीएमसीच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २००७ आणि २०१२ साली पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. ८ मार्च २०१७ रोजी त्यांनी मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला होता. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत महाडेश्वर मुंबईचे महापौर होते. २०१९ मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा :  

Back to top button