Sanjay Raut : संजय राऊतांनी केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक; काय आहे रणनीती? | पुढारी

Sanjay Raut : संजय राऊतांनी केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक; काय आहे रणनीती?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. एरव्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणारे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. याविषयी उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले. नेमके संजय राऊत यांनी फडणवसींचे कोणत्या कारणासाठी कौतुक केले… जाणून घ्या सविस्तर

Sanjay Raut : नागपूर कॅन्सर रुग्णालयावरून राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक

नुकचे नागपूर येथे कँसरवरील उपचारांसाठी मोठे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. याचे स्पष्टीकरण देताना, राऊत म्हणाले चांगले काम कोणी केले असेल तर त्याचे कौतुक केलेच पाहिजे. कँसरग्रस्त रुग्णांची काय परिस्थिती आहे. याची आम्हाला जाणीव आहे. मुंबईतील टाटांच्या कँसर रुग्णालयात आम्ही रुग्णांची परिस्थिती पाहत असतो. टाटांच्या रुग्णालयात देशभरातून कँसर उपचारासाठी लोक येतात. त्यामुळे तशा प्रकारचे दर्जेदार उपचार जर रुग्णांना नागपूरमध्ये मिळणार असतील, तर अशा चांगल्या कामाचे कौतुक करायलाच हवे, मग ते कोणीही केले असो.

Sanjay Raut : रिफायनरीबाबत ठाकरे गट पवारांशी असहमत?

यावेळी माध्यमांशी बोलताना, रिफायनरी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. रिफायनरीबाबत शरद पवार म्हणाले होते स्थानिक जनतेला समजून त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले विश्वासात घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य असून पवारांच्या वक्तव्याशी ठाकरे गट असमहत असल्याचे संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून दिसते.

तसेच बारसूच्या रहिवाशांचा विरोध डावलून सरकार ज्या पद्धतीने भूसंपादन आणि सर्वेक्षण करत आहे, तो त्यांनी तातडीने बंद करावा. तसेच तिथे हा प्रकल्प होणार आहे. यासाठी अनेकांनी स्थानिकांनी तिथे जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारचा हा अट्टाहास सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Sanjay Raut : भाजपला राज्याच्या सरकारचे ओझे

यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, भाजपला राज्याच्या सरकारचे ओझे झाले आहे. आता हे ओझे किती काळ वाहायचे हे त्यांचे त्यांच्या सरकारने ठरवावे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

हे ही वाचा :

Stock Market Opening | सेन्सेक्सने सुरुवातीची तेजी गमावली, ‘या’ स्टॉक्सचे नुकसान

India Corona Update : दिलासाायक! कोरोना रुग्णसंख्येत घट; देशात गेल्या २४ तासांत ७,५३३ नवे रुग्ण

Back to top button