Maharashtra Political Crisis : अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह विधानभवनात दाखल | पुढारी

Maharashtra Political Crisis : अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह विधानभवनात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन आमदारांसह विधानभवनात दाखल झाले आहेत.

भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आहेत राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी सुमारे ४० आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या आमदारांनी अजित पवार यांना संमतीच्या सह्या दिल्या आहेत. योग्य वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने राष्ट्रवादी पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

अजित पवार राष्ट्रवादीत थांबणार नाहीत : अब्दुल सत्तार

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहीच पत्र देखील त्यांच्याकडे असल्याच चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवार भाजपसोबत येत असतील तर ही गोड बातमी आहे, ते राष्ट्रवादीत थांबणार नाहीत. पण पुढील ५ वर्षे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा त्यांनी केला आहे.

मंत्री सत्तार म्हणाले की, “राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीची कारणे आणि खरी माहीती या विषयाचे नेते शरद पवार यांनाच माहित आहे. अजित पवार आता राष्ट्रवादीत थांबणार नाहीत. ते सरकारसोबत येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील. मुख्यमंत्री शिंदे यांची जी भूमिका असेल ती आम्हाला मान्य आहे. सर्व पक्ष त्यांच्या मागे आहे. ते ४० आमदारांचा विचार करून निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button