Farmers Drought Relief Package | पाच हजारांची दुष्‍काळी मदत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्‍या खात्‍यात

Farmers Drought Relief Package |
Farmers Drought Relief Package | पाच हजारांची दुष्‍काळी मदत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्‍या खात्‍यात
Published on: 
Updated on: 

मुंबई : दुष्काळ जाहीर केलेल्या ३०४ तालुक्यांत झालेल्‍या नुकसानीचे आतापर्यंत ९० टक्‍क्‍यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले असून दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणार्‍या ५ हजार रुपये मदतीचे वितरण पुढील आठवड्यात होणार आहे.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाच्या सादरीकरणानंतर राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीचा अंतिम प्रस्तावही पुढील आठवड्यात पाठवणार आहे. राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपयांचा प्राथमिक प्रस्ताव पाठविला होता. मात्र, कृषी, पाणीपुरवठा, शालेय उच्च शिक्षण विभाग, मृदा व जल संधारण व दुष्काळाशी संबंधित विभागांची एकत्रित मागणी ३५ हजार कोटींची असल्याने सुधारित प्रस्ताव पाठविला जाणार आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे काम पुढील काही दिवसांत शंभर टक्के पूर्ण होईल. त्यानंतर प्रस्तावास अंतिम रूप देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंचनाम्यांवर आधारित केंद्र सरकारची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार होत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल महिन्याच्या रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यांच्याकडे दिला आहे. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जाणार असून त्यासाठी नव्याने दर जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप केंद्र सरकारने हे दर निश्चित करून राज्य सरकारला पाठविलेले नाहीत. त्यामुळे जुन्या दराप्रमाणे प्रस्ताव तयार केला जात आहे.

दोन विभागांत ९९ टक्‍के पंचनामे

३०४ तालुक्यांतील ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात हे प्रमाण ९९ टक्के आहे. यापाठोपाठ नाशिक ९० टक्के, पुणे ९२ टक्के, कोल्हापूर ५३ टक्के, लातूर ९७ टक्के, नागपूर ७८ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोकण विभागात केवळ १२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news