वाढत्या किमतींमुळे मुंबईत वाहन खरेदी घटली; चारचाकीत ५० टक्के, तर बाईकच्या खरेदीत २८ टक्के घट | पुढारी

वाढत्या किमतींमुळे मुंबईत वाहन खरेदी घटली; चारचाकीत ५० टक्के, तर बाईकच्या खरेदीत २८ टक्के घट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरात विस्तारत असलेले मेट्रोचे जाळे, बेस्टच्या प्रवासाला प्राधान्य, वाहनांचे आणि इंधनाचे वाढते दर यामुळे चारचाकी आणि बाईकच्या खरेदीत यावर्षी घट झाली आहे.

यंदाच्या गुढीपाडव्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन कारच्या नोंदणीत ५०, तर बाईक खरेदीत २८ टक्के घट झाली आहे. पश्चिम उपनगरात मेट्रो ए आणि ७ सुरू झाल्यामुळे नागरिक जलद आणि गर्दीमुक्त प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा अंधेरी आणि बोरिवली या पश्चिम उपनगरांतील दोन प्रमुख आरटीओमध्ये गुढीपाडव्याला होणारी वाहनांची नोंदणी कमी झाली आहे. नाही. कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्यासाठी अनेकांनी चारचाकी आणि बाईक खरेदीवर भर दिला होता. यावेळी आखडता हात घेतला आहे.

तसेच गेल्या काही दिवसांत वाहनांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. तसेच इंधनाचे दरदेखील कमी झालेले नाही. कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्यासाठी अनेकांनी चारचाकी आणि बाईक खरेदीवर भर दिला होता. यावेळी आखडता हात घेतला आहे.

नागरिकांना इलेक्ट्रिक गाड्यांची प्रतीक्षा

शहरात इलेक्ट्रिक गाड्या धावत असल्या तरी चार्जिंग स्टेशनची संख्या खूपच कमी असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिक इलेक्ट्रिक गाड्यांसाठी पायाभूत सुविधा सुरू होण्याची वाट पाहात आहेत. तसेच येत्या काळात ई- कार आणि ई-बाईकच्या किमती कमी होतील अशी अपेक्षा आहे.

यंदाच्या गुढीपाडव्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन कारच्या नोंदणीत ५०, तर बाईक खरेदीत २८ टक्के घट झाली आहे. पश्चिम उपनगरात मेट्रो ए आणि ७ सुरू झाल्यामुळे नागरिक जलद आणि गर्दीमुक्त प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा अंधेरी आणि बोरिवली या पश्चिम उपनगरांतील दोन प्रमुख आरटीओमध्ये गुढीपाडव्याला होणारी वाहनांची नोंदणी कमी झाली आहे.

Back to top button