राज्यातील 49 पोलिसांना राष्ट्रपती पदक

सात शौर्य, तीन उल्लेखनीय, तर 39 गुणवत्तापूर्व सेवेसाठी पदक जाहीर
49-police-officers-from-maharashtra-awarded-presidents-medal
राज्यातील 49 पोलिसांना राष्ट्रपती पदक
Published on
Updated on

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील 1090 पोलिसांना विविध सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर केले असून, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील 49 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना उत्कृष्ट सेवेसह शौर्य आणि गुणवत्तापूर्वक राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले आहे. त्यामध्ये सातजणांना शौर्य, तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी, तर 39 जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.

पदक विजेत्यांमध्ये वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे, आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार, ज्योती देसाई, राजन मोने आदींचा समावेश आहे. सहायक आयुक्त नेताजी बंडगर, सहायक उपनिरीक्षक मनोहर महाका, हेड कॉन्स्टेबल मनोहर लचमा पेंडम, कॉन्स्टेबल प्रकाश ईश्वर कन्नाके, अतुल योगोळपवार, हिदायत सददुल्ला खान आणि सुरेश तेलमी (मरणोत्तर) यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यात पोलिस महानिरीक्षक अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी आणि सहायक आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांचा समावेश आहे.

39 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यामध्ये सहायक आयुक्त शैलेंद्र धिवार, ज्योती देसाई, राजन माने, कैलास पुंडकर, नरेंद्र हवरे, प्रमोदकुमार शेवाळे, दत्तात्रय ढोले यांचा समावेश आहे. तसेच उपधीक्षक संजय चंदखेडे, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र वाणी, निरीक्षक आंचल मुद्रल, दीपककुमार वाघमारे, सत्यवान माशाळकर, ओहरसिंग पटेल, विश्वास पाटील, सतीश जाधव, उपनिरीक्षक संदीप शिंदे, संदीप मोरे, काशिनाथ राऊळ, जोसेफ डिसिल्वा, सुनील चौधरी, आनंदराव पवार, अनिल ब्राह्मणकर, सुभाष हांडगे यांचा पदक विजेत्यांत समावेश आहे.

सहायक उपनिरीक्षक दीपक परदेशी, अशोक जगताप, उपअधीक्षक बाळासाहेब भलचीम, रमेश ताजने, अविनाश नवरे, अनंत व्यवहारे, धोंडिबा भुट्टे, हर्षकांत पवार, प्रमोद पवार, राजेंद्र मोरे, जितेंद्र कोंडे, संजय शिरसाट, सहायक कमांडर सुरेश कराळे, रमेश वेठेकर, हेड कॉन्स्टेबल संजीवकुमार माथुर, रमेश कुंभलकर यांचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news