

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : बेलापूर सेक्टर पंधरा येथील इंपिरीया ग्रुपचे साऊजी मंजिरी (वय ६५) यांची नेरूळ सेक्टर सहा येथे भररस्यात गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (दि. १५) संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
बिल्डर साऊजी मंजिरी हे कारने नेरूळ सेक्टर सहा अपना बाजार समोरील रस्त्याने जात होते. दरम्यान मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी कार अडवून गोळ्या झाडल्या. यामुळे गंभीर जखमी झालेले साऊजी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती कळताच डीसीपी अमित काळे, डीसीपी पानसरे यांच्यासह क्राईम ब्रँचच्या अधिकारी आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे पीआय यांनी घटनास्थळी पाहणी केली. हा खून जमिनीचा व्यवहार, प्राॅप्रटी किंवा इतर फिसकटलेल्या आर्थिक व्यवहारातुन झाल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. इंपिरीया ग्रुपचे साऊजी मंजिरी यांच्यासह पाच जण भागीदार आहेत.