मुंबई : मालाड येथे १० सिलेंडरचा स्फोट; अप्पापाड्यातील झोपड्यांना भीषण आग | पुढारी

मुंबई : मालाड येथे १० सिलेंडरचा स्फोट; अप्पापाड्यातील झोपड्यांना भीषण आग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मालाड (पू) अप्पापाड्यातील वन जमिनीवरील झोपड्यांना भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाली नसून झोपड्या मोठ्या प्रमाणात जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. झोपडपट्टीमध्ये एका-मागून एक सिलेंडरचा स्फोट होत आहे. आतापर्यंत सुमारे ८ ते १० सिलेंडर फुटल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आली.

अप्पापाडा आणि महेश्र्वरीनगर हे वन जमिनीवरील झोपडपट्टी आहे. याठिकाणी प्लस्टिक आणि पत्र्याच्या झोपड्या आहेत. दुपारी ४.३० दरम्यान अचानकपणे एक सिलेंडर फुटल्याने नागरिकांनी आपला जीव वाचविण्याकरिता घराबाहेर पळ काढला. यानंतर एका-मागून एक अशी १० सिलेंडर फुटली. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे आणि अरूंद रस्त्यामुळे बचाव कार्याला अग्निशमन दलाला अडथळ येत आहे. यामुळे आग विझविण्यास विलंब होत आहे.

१३ फेब्रुवारी रोजी मालाड येथील जामऋषी नगरातील झोपड्यांना अशाप्रकारे भीषण आग लागली होती. या आगीच्या घटनेला आज एक महिना पुर्ण होत नाही, तोच पुन्हा अप्पापाड्यातील झोपड्यांना अग लागली आहे. यामुळे आग लागली कि लावली जात आहे. याकडे आता पोलीसांनी चौकशी करण्याची मागणी संतप्त झोपडीधारकांकडून केली जात आहे.

सिलेंडर डोक्यावर घेवून नागरिकांची पळापळ

आग लागल्याने आपल्या झोपडीतील सिलेंडर डोक्यावर, खाद्यांवर घेवून नागरिकांची पळापळ सुरु आहे. सर्वेत्र एकच खळबळ उडाली आहे. भयभीत झोपडीधारकांच्या अश्रूचा बांध फूटलेला आहे.

Back to top button