Vinod Kambli : विनोद कांबळी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

Vinod Kambli : विनोद कांबळी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कांबळी यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला आहे. पत्नी अँड्रिया यांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

विनोद कांबळी हा यापूर्वीही अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी त्‍याने म्हटले होते की,सध्या आर्थिक मंदीतून जावे लागत असून आपल्‍याकडे कमाईचे कोणतेही साधन नाही.  शुक्रवारी (दि. ३) त्याने आपल्‍या पत्नीला मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पत्नी अँड्रिया हिने आपल्‍या तक्रार पती विनोद कांबळी याने मारहाण केल्याचे म्हटले आहे.

विनोद कांबळी याने स्‍वयंपाकघरातील एक भांडे आपल्‍या अंगावर फेकले, असा आरोप अँड्रियाने केला आहे. या मारहाणीत अँड्रिया यांच्या डोक्याला दुखापत झाल्‍याचे वांद्रे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button