थर्टीफर्स्टसाठी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज! १०० ठिकाणी नाकाबंदी | पुढारी

थर्टीफर्स्टसाठी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज! १०० ठिकाणी नाकाबंदी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईकर थर्टीफर्स्टचं जोरदार स्वागत करण्यासाठी प्लॅन आखत आहेत. थर्टीफस्‍टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस यंत्रणा आणि वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहेत. यंदा मुंबईत थर्टीफर्स्टचं जल्लोषात स्वागत होणार असल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. तर रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल २००० वाहतूक पोलीस मुंबईत तैनात असणार आहेत.

मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून ४ पोलीस उपायुक्त, २००० वाहतूक पोलीस कर्मचारी, वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक मार्ग बंद राहणार असून, अनेक ठिकाणी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहराच्या १०० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

…हे मार्ग राहणार बंद ! 

मरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लायओव्हरपर्यंत उत्तर वाहिनी गरज भासल्यास बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button