
मुंबई : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी आलेल्या 7 हजार 78 अर्जांपैकी 2 हजार 938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 4 हजार 140 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच विविध ठिकाणी तपासणीत 262 कोटींपर्यंत रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
चोक्कलिंगम म्हणाले, 185 मतदारसंघांत 1 बॅलेट युनिट, 100 मतदारसंघांत 2 बॅलेट आणि 3 मतदारसंघांत 3 बॅलेट लावले आहेत. राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला, तर तृतीयपंथी 6 हजार 101 मतदार आहेत. तसेच सेनादलातील 1 लाख 16 हजार 170 मतदार आहेत. शहरात 42 हजार 604, तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्रे आहेत. एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी म्हणाले, आचारसंहिता लागू झाल्यापासून 46 हजार लोकांवर कारवाई केली असून, आतापर्यंत 252 जप्त करण्यात आले आहेत. 138 कोटींच्या सोन्याच्या जप्तीसंदर्भात तपास सुरू आहे. ते सोन्याच्या इंडस्ट्रीकडून व्यापार्यांकडे जाणारे ते सोने होते, अशी प्राथमिक माहिती आहे.