मुंबई : अंधेरीत कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना ५० लाखांची लाच घेताना अटक | पुढारी

मुंबई : अंधेरीत कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना ५० लाखांची लाच घेताना अटक

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेच्या के/पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांना अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांनी एका कंपनीची अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर कंपनीच्या मालकांनी कार्यकारी अभियंता सतीश पवार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अंधेरी पूर्वेतील मुंबई महापालिका के/पूर्व कार्यालयात सापळा लावून कार्यकारी अभियंता सतीश पवार यांना ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सध्या एसीबी विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button