

मुंबई : 34 कोटी रुपयाच्या हिऱ्याचा अपहार प्रकरणाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. लवकरच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तक्रारदार हे हिरे व्यापारी आहेत. 2021 ते सप्टेंबर 2025 या काळात एकाने त्याच्याकडे कमी प्रमाणात हिरे खरेदी केले. हिरे खरेदी केल्यावर त्याने वेळेत पैसे दिले. त्यामुळे तक्रारदार याचा विश्वास वाढला. त्यानंतर त्याने तक्रारदार याना दुबई येथे एका खासगी हिरे कंपनीचा आयपीओ येणार असल्याचे सांगितले.
त्या आयपीओ मध्ये 25 टक्के भाग भांडवल देऊ असे सांगून प्रस्ताव दिला. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार याने होकार दिला. होकार दिल्यावर तक्रारदार याने त्याना हिरे दिले. हिरे दिल्यावर दोघांनी तक्रारदार यांना काही धनादेश दिले. ते धनादेश वटले नाहीत. घडल्या प्रकरणी त्याने आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली.
पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेऊन प्राथमिक चौकशी सरू केली आहे. चौकशी दरम्यान काही बाबीचा उलगडा होणार आहे. पोलीस सर्व बाजूने तपास करीत असून आरोपी लवकरच गजाआड होतील, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला.