मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या आमिषाने बलात्कार, मनसे पदाधिकाऱ्याला अटक | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या आमिषाने बलात्कार, मनसे पदाधिकाऱ्याला अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गिरगावात घडली आहे. वृशांक वडके असे या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव असून व्ही. पी. मार्ग पोलिसांनी त्याला बलात्कार आणि धमकावल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

पुढील दोन-तीन महिन्यात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. तसेच, या निवडणुकीच्या तिकीटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मनसेचा विभागप्रमुख असलेल्या गिरगावातील रहिवासी वडके याने यातील ४२ वर्षीय पीडित महिलेला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकिट देण्याचे आश्वासन दिले होते.

पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या बहाण्याने वडके याने सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यानच्या काळात बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button