दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा : श्रीकांत शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार | पुढारी

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा : श्रीकांत शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे, असे ट्विट करत खासदार शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या घरी गणपती दर्शनाला जात आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमांचे कॅमेरेही असतात. यावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका करताना काही लोकांना शो करण्याची सवय आहे, असे म्हटले होते. या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

अजित पवार यांनी काय केली होती टीका ?

आपल्याकडे गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला सण आहे. आधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढ्या मोठ्या संख्येने गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. सध्या जावे लागत आहे. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरेसोबत घेऊन जात नाहीत. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राज कपूर शो मॅन होते, तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button