देवेंद्र फडणवीस-अशोक चव्हाण भेटीवरून बाळासाहेब थोरातांचा मोठा खुलासा

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. यामुळे आता कोणते राजकीय स्थित्यंतर होणार या चर्चेला उधाण आले होते. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही यावेळी थोरात म्हणाले.

माझी आणि आशोक चव्हाणांची यांची भेट नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

माझी आणि अशोक चव्हाणांची कोणत्याही प्रकारे भेट झालेली नाही. एका ठिकाणी दर्शनासाठी गेले असता, आम्ही एकमेकांसमोर आलो असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुणे स्टेशन डेपोच्या उद्धाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news