नारायण राणेंना मंत्री केल्याने ठाकरेंचे मोदींसोबतचे संबंध बिघडले; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट | पुढारी

नारायण राणेंना मंत्री केल्याने ठाकरेंचे मोदींसोबतचे संबंध बिघडले; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असलेले संबंध जपण्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तयारी होती, पण नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करणे ठाकरे यांना पटलं नाही. त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांचे मोदी यांच्यासोबतचे संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.५) पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदरांचे निलंबन केल्यामुळे प्रकरण आणखीच बिघडले, असेही केसरकरांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, दिववंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपचे व्यासपीठ वापरून नारायण राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरे यांची बदनामी केली होती. राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यासोबत संपर्क करण्याचा मी प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला. यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव यांची भेट झाली, असे केसरकर म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button