Mangesh Chivate : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू होणार; मंगेश चिवटे यांची कक्ष प्रमुखपदी नियुक्‍ती | पुढारी

Mangesh Chivate : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू होणार; मंगेश चिवटे यांची कक्ष प्रमुखपदी नियुक्‍ती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या विशेष कार्याधिकारीपदी करमाळ्याचे मंगेश चिवटे यांची नियुक्‍ती झाली आहे. मूळ संकल्पक असणारे मंगेश चिवटे यांची नियुक्‍ती झाल्याने या कक्षांतर्गत राज्यात रुग्णसेवेला अधिक गती मिळणार आहे.

राज्यात 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी, ही संकल्पना मांडली. आणि तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी हा कक्ष सुरू केला. चिवटे यांच्या या संकल्पनेचे आणि त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2019 रोजी हा कक्ष बंद करण्यात आला. हा कक्ष पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी चिवटे यांनी प्रयत्न केले. त्यास प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांची कक्षाच्या विशेष कार्याधिकारीपदी नियुक्‍ती केली. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून राज्यातील रुग्णांना 24 तास सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन मंगेश चिवटे यांनी दिले आहे.

Back to top button