ठाणे : कसारा घाटात ट्रक दुभाजकावर आदळून पलटी; १ ठार; ३ गंभीर जखमी | पुढारी

ठाणे : कसारा घाटात ट्रक दुभाजकावर आदळून पलटी; १ ठार; ३ गंभीर जखमी

कसारा ; पुढारी वृत्‍तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकाला आदळून पलटी झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग सुरक्षा पोलीस व कसारा पोलीस कर्मचारी यांनी मदत करून जखमींना कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या बाबत अधिक माहिती अशी की, आज (मंगळवार) पहाटे मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कसारा बायपास साईबाबा खिंडी जवळ ट्रक चालकाचे ( MH -18, BA 8566) वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. ट्रक पलटी होऊन दोनजण ट्रकच्या खाली दबले गेले. या अपघाताची माहिती समजताच कसारा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. पलटी झालेल्या ट्रक खाली एकजण दबल्याचे दिसताच त्यांनी कसारा येथील आपत्ती टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना मदत करण्याची विनंती केली.

आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, जस्विंदर सिंग, बाळू मंगे, देवा वाघ, बबन सोनवणे, दत्ता वाताडे, मनोज मोरे, विनोद आयरे, बिरु ठाकुर यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी जखमीपैकी एकजण ट्रकच्या खाली अडकलेला होता. त्याला आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी मृत व गंभीर जखमींना तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

ट्रकचालक आनंद त्रिभुवन जागीच ठार झाले, तर अमोल गायकवाड, संतोष शेलार, अण्णासाहेब त्रिभुवन हे गंभीर जखमी झाले होते.  गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहीका, 1033 रुग्णवाहीकेच्या मदतीने कसारा येथील प्राथमिक रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातात मृत अमोल त्रिभुवन यांचा पुतण्या अण्णासाहेब त्रिभुवन याला तीन तास अथक प्रयत्न करून बाहेर काढल्याने त्याचेही प्राण वाचले. या मोहीमेत कसारा पोलीस ठाण्याचे बाळू चौधरी, राम रोंगर्टे, टोल पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी मदतीला होते. ट्रकमधील सर्वजण मुंबईहून सिन्नरला जात होते.

हेही वाचा :  

Back to top button