वाहनांचा थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागणार; ‘इतका’ भरावा लागेल प्रीमियम

वाहनांचा थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागणार; ‘इतका’ भरावा लागेल प्रीमियम

मुंबई : वृत्तसंस्था; येत्या 1 जूनपासून मोठ्या वाहनांसह सर्वच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना थर्ड पार्टी इन्श्युरन्ससाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल.

भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरणाने (ईर्डा) मोटार वाहनांच्या थर्ड पार्टी इन्श्युरन्सचे दर वाढवण्यासाठी मसुदा तयार केला आहे.

या नव्या नियमांनुसार, चारचाकी वाहनांसाठी 1,000 सीसी क्षमतेच्या खासगी वाहनांसाठी अंदाजे 2,094 रुपये भरावे लागतील. याआधी ही रक्कम अंदाजे 2,072 रुपये होती. याचप्रमाणे 1,000 सीसी ते 1,500 सीसी क्षमतेच्या खासगी वाहनांसाठी अंदाजे 3,416 रुपये द्यावे लागतील. आधी त्यासाठी सर्वसाधारणपणे 3,221 रुपये मोजावे लागत होते. तर 1,500 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहन मालकांना अंदाजे 7,890 रुपयांच्या तुलनेत 7,897 रुपये प्रीमियमसाठी मोजावे लागतील.

दुचाकी वाहनांसाठी अंदाजे 150 सीसी ते 350 सीसी क्षमतेच्या वाहनांसाठी अंदाजे 1,366 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. तर 350 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांसाठी अंदाजे 2,804 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 30 किलोव्हॅटपर्यंतच्या नवीन खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) तीन वर्षांचा सिंगल प्रीमियम 5,543 रुपये आकारण्यात येईल. 30 ते 65 किलोवॅट अधिक क्षमतेच्या ईव्हींसाठी, तो 9,044 रुपये असेल. मोठ्या ईव्हीसाठी तीन वर्षांचा प्रीमियम 20,907 रुपये असेल.

इलेक्ट्रिक व्हेईकल प्रीमियम

30 किलोव्हॅट तीन वर्षांचा सिंगल प्रीमियम 5,543 रुपये
30 ते 65 किलोव्हॅट 9,044 रुपये प्रीमियम
मोठ्या ईव्हींसाठी 20,907 रुपये
7 ते 16 किलोवॅट 6,260 रुपये
उच्च क्षमतेच्या ईव्ही दुचाकी पाच वर्षांसाठी 12,849 रुपये

दुचाकी वाहने प्रीमियम

150 सीसी ते 350 सीसी 1366 रुपये
350 सीसीपेक्षा अधिक 2804 रुपये

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news