आधी इंधनाच्या किंमती वाढवून नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा कशाला : उद्धव ठाकरे | पुढारी

आधी इंधनाच्या किंमती वाढवून नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा कशाला : उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला आणि आज तो ८ रुपयांनी कमी केला. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

वाढत्या इंधन दरवाढी (Petrol Diesel Price)  बरोबर जीवनावश्यक ठरणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरांमध्ये देखिल मोठी वाढ सातत्याने होत होती. त्यामुळे घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरवर केंद्राने २०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय यावेळी केंद्राकडून घेण्यात आला. अशा पद्धततीने केंद्राने इंधनावरील अबकारी कर कमी करत पेट्रोल डिझेलचे दर कमी केले.

तसेच दुसरीकडे एलपीजी गॅसवर देखिल सबसिडी देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button