मुंबई प्रदूषित केल्याचा १,८६७ बांधकाम कंत्राटदारांवर ठपका

Mumbai pollution : खासगीसह सरकारी प्रकल्‍पांच्या कत्राटदारांनाही नोटीस
1,867 construction contractors accused of polluting Mumbai
मुंबई प्रदूषित केल्याचा १,८६७ बांधकाम कंत्राटदारांवर ठपकाFile Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरात दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्‍याने नागरिकांच्या आरोग्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे महानगरपालिकेकडून कठोर पावले उचलण्यात येत असल्‍याचे दिसून येत आहे. याच अनुशंगाने मुंबईतील १,८६७ बांधकाम कंत्राटदारांवर मुंबई प्रदूषित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नियमावलीचा भंग केल्याने पालिकेने पाच महिन्यांत या नोटिसा बजावलेल्‍या आहेत.

प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग केल्‍याने नोटीस

प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग करणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच आहे. ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत एक हजार ८६७ कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग करणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच आहे. ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत एक हजार ८६७ कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Mumbai pollution)

प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी पालिकेने खासगी कंत्राटदारासह सरकारी प्रकल्प, बांधकाम करत असलेल्या कंत्राटदारांनाही नोटीस बजावली आहे. आतापर्यंत २०१ बांधकामांना काम थांबविण्याची नोटीस देतानाच त्यांचे काम बंद करण्यात आले होते. मात्र, नियमावलीची पूर्तता केल्यानंतर संबंधित ठिकाणी पुन्हा काम सुरू करण्यास परवनगी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news