नवनीत राणांच्या खार येथील घराची तपासणी लांबणीवर

नवनीत राणांच्या खार येथील घराची तपासणी लांबणीवर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील लाव्ही' इमारतीमधील घरामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेकडे आली होती. त्यानुसार पालिकेच्या एच पश्चिम विभागाचे एक पथक बुधवारी (दि.४) दीड वाजण्याच्या सुमारास राणा यांच्या घरी पोहचले. पण राणा दाम्पत्य घरी नसल्यामुळे पथक गेल्या पावली परत परतले.

खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा यांचे घर आहे. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्या व्यतिरिक्त  बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम 488 नुसार नोटीस पाठवली होती. त्यानुसार पालिकेच्या एच पश्चिम विभागाचे पथक बुधवारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र रवी राणा व नवनीत राणा घरी नसल्यामुळे हे पथक पून्हा माघारी फिरले. दोन ते तीन दिवसानंतर हे पथक पुन्हा राणा यांच्या घरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news