गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलीसांनी घरातून उचलले; आजच अटकेची कारवाई होणार ?

गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलीसांनी घरातून उचलले; आजच अटकेची कारवाई होणार ?
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात 107 जणांविरोधात कट रचून दंगल घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एसटीतील कर्माचार्‍यांसह अन्य आंदोलनकर्ते आरोपी आणि 23 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी प्रसीद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचार्‍यांनी अचानकपणे जमा होत आंदोलन सुरु केले. आंदोलक एसटी कर्मचार्‍यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसून थेट सिल्वर ओकला लक्ष्य करत दगड आणि चपला फेकण्यास सुरुवात केली. आंदोलनकर्ते हे सिल्वर ओकच्या दरवाजा पर्यंत पोहचले होते. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी एकूण 107 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास सहाय्यक आयुक्त पांडुरंग शिंदे यांच्या पथकाने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या लोअर परळ येथील घरी जात त्यांना ताब्यात घेतले. अ‍ॅड. सदावर्ते यांनी कोणतीही नोटीस न देता त्यांना ताब्यात घेत गावदेवी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याकडे चौकशी सुरु केल्याची माहिती मिळते. मात्र मला एका अतिरेक्यासारखे आणले आहे. माझी हत्या होऊ शकते. मला काही झाल्यास याला फक्त दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असे अ‍ॅड. सदावर्ते यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण ? याचा शोध घेणार : गृहमंत्री वळसे पाटील

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा कोणीही मोठा नेता नव्हता. त्यामुळे या आंदोलकांना कोणी भडकवले का? एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामागे कोण आहेत? याचा शोध मुंबई पोलिस घेणार आहेत. कोणाच्या सांगण्यावरून आंदोलक सिल्‍व्हर ओकवर आले या बद्दलची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

या घटनेबद्दल गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्वीट करत प्रतिक्रिय दिली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला लागलेले वळण चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अनाठायी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे गरजेचे आहे. संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत अशी भूमीका वळसे पाटील यांनी मांडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news