मुंबई; पुढारी ऑनलाईन : एसटी कर्मचाऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पल तसेच दगडफेकीचा प्रकार घडला. या तासभराच्या नाट्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना नेतृत्वाला दोष दिला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या नाही असे पवार म्हणाले. नेता चुकीचा असला, की काय होत ते आज दिसून आलं. कारण नसताना एसटी कर्मचारी नोकरीपासून बाजूला राहिला. चुकीचा मार्ग कोण दाखवत असेल तर विरोध करण सर्वाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
थोडी माहिती मिळाल्यानंतर अनेकजण पोहोचले, मी वेगळ सांगायची गरज नाही असेही ते म्हणाले.