मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून, त्यातच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये लागलेली चुरस या दरम्यान थरावर थर रचताना दुपारपर्यंत मुंबईत सुमारे १५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोविंदांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. या सर्व गोविंदाची प्रकृती ठिक आहे. (Dahi Handi 2024)
मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे, मात्र गोविंदाचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. सकाळपासूनच मुंबईतील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यास सुरुवात केली आहे. दहीहंडी फोडताना जखमी गोविंदा दुपारपासून रूग्णालयात येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली आहे.
जखमी गोविंदांपैकी केईएम रुग्णालयात १, पोद्दार रूग्णालयात ४, सेंट जॉर्जेस १, नायर रुग्णालयात ४, सायन २, राजावाडीत ४, एमटी अग्रवाल १, कुर्ला भाभा रूग्णालयात १ गोविंदावर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले आहे.