डोंबिवली : आंदोलनकर्त्या २७ शिवसैनिकांची १० वर्षानंतर निर्दोष मुक्तता | पुढारी

डोंबिवली : आंदोलनकर्त्या २७ शिवसैनिकांची १० वर्षानंतर निर्दोष मुक्तता

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा शिवसेनेशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधल्याने कल्याण लोकसभा मतदार संघाचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्या एमआयडीसी कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी मोर्चा काढला हाेता. जमावबंदी आदेशाचा भंग करून मोर्चा काढणाऱ्या या २७ शिवसैनिकांची १० वर्षानंतर कल्याणच्या न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पी. एन. ढाणे यांनी निर्दोष मुक्तता केली.  शिवसैनिकांनी 20 जानेवारी 2012 रोजी हे आंदोलन केले होते.

खा. आनंद परांजपे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी 20 जानेवारी 2012 रोजी सदानंद थरवळ, संजय मांजरेकर, राजू नलावडे, ‌स्मिता बाबर, भाऊसाहेब चौधरी, तात्या माने, संदीप नाईक यांच्यासह 27 शिवसैनिकांनी खासदारांच्या एमआयडीसीच्या निवासी विभागातील कार्यालयावर मोर्चा काढून घोषणाबाजी केली होती. मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवून मानपाडा पोलिस ठाण्यात तत्कालीन बाळकृष्ण साळुंके यांच्या सरकारतर्फे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सपोनि महेंद्र शिंदे केरत होते. या प्रकरणी 30 ऑगस्ट 2012 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हा खटला गेल्या 10 वर्षांपासून कल्याण न्यायालयात सुरू होता. या खटल्याचा निकाल न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पी. एन. ढाणे यांनी (गुरूवार) जाहीर केला. सीआरपीसीच्या कलम 321अंतर्गत हा खटला मागे घेऊन 27 आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायदंडाधिकारी ढाणे यांनी जाहीर केले.

हेही वाचलं का?

Back to top button