किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारमधील डर्टी डझन सादर ! अजित पवार सहाव्या नंबरवर | पुढारी

किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारमधील डर्टी डझन सादर ! अजित पवार सहाव्या नंबरवर

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कित्येक दिवसांपासून टीकास्त्र सुरू आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्री नवाब मलिक याच्यांवर कारवाई झाली. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील १२ नेत्यांची नावे जाहीर केली. त्यांनी या १२ नेत्यांना डर्टी डझन म्हणत ट्वीटमध्ये नावे टाकली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत यांच्याही नावाचा समावेश आहे. (Kirit Somaiya)

यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेते कितीवेळा आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्टी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपासयंत्रनेच्या माध्यमातून आणि कारवाई सुरू आहे.

या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परबही आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली आहे.

अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर ? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट केला. पत्रकार मला नेहमी म्हणतात आता कोणावर कारवाई होणार यासाठी मला मोठी चिट्टी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचे हे त्यांनीच ठरवावे, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. ते मुंबईत नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी बोलत होते.

मी काही संजय राऊत नाही. चणेवाल्याकडे जाऊन दोन ट्रक रद्दीचे पेपर घेऊन जाणार. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचे नाव संजय राऊत सांगू शकले नाहीत. कुठे आहे वाधवान? अशी फडतूस नाटकं, नौटंकी उद्धव ठाकरे यांची माणसे करतात, आम्ही कागदपत्रांसह सांगतो.

आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कोणाचा ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काढू द्या. त्यांना ठरवू द्या कोणत्या नेत्याला आधी तुरुंगात पाठवायचं, असे सोमय्या यावेळी म्हणाले.

हे ही वाचलं का ?

Back to top button