Fourth Loan Waiver List | कर्जमाफीच्या चौथ्या यादीत राज्यातील सव्वा लाख शेतकरी

Farmer Loan Waiver
Farmer Loan Waiver
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत राज्य सरकारने गुरुवारी चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकापेक्षा अधिक बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तर तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश होता. आता चौथ्या यादीतील १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यानुसार आतापर्यंत एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. पात्र ठरलेल्या १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत आतापर्यंत १३,२७५ कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

३१ मार्च २०२६ पर्यंतच्या थकबाकीवर दिलासा

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरीत झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जासह पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जांना या योजनेतून दिलासा दिला जात आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड झालेली नसणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news