मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल भाजपवर पत्रकार परिषद घेऊन तोफ डागल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रत्युत्तरासाठी पत्रकार परिषद घेतली. राणे यांनी संजय राऊतांना घाम का फुटला होता ? अशी विचारणा केली. संजय राऊत यांची परिस्थिती केविलवाणी परिस्थिती पाहिली असे राणे म्हणाले.
त्यांना आजपर्यंत शिवसेना भवन का आठवलं नाही ? संजय राऊतांना का घाम फुटला होता ?अशी विचारणा केली. नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या शब्दांवरून टीका केली. मर्द आहे म्हणून सांगता, तर आम्ही कुठ विचारलं होत ?