किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत हातात घेतली चप्पल अन्…

File Photo
File Photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांराना किरीट सोमय्या यांनी बुधवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर देत, अलिबागमध्ये रश्मी ठाकरे यांची मालमत्ता असल्याचे पुरावे सादर केले. अलिबामधील १९ घरांचा कर रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रविंद्र वायकर यांनी भरला. बंगले नावावर नाहीत तर कर का भरता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्याकडून जोड्याने मारण्याची भाषा वापरण्यात आली. यावर नाराजी व्यक्त करीत भर पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी चप्पल काढून आपण सादर केलेले पुरावे खोटे असल्यास जोड्याने मार खाण्यास तयार आहे, असे आव्हान संजय राउत यांना दिले.

पंरतु, नील सोमय्या विषयी बोलतांना ते गोंधळलेले दिसून आले. ४०० कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी नील संबंधित कंपनीशी जोडला गेला. हा अगदी छोटा प्रोजेक्ट आहे. नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचे असेल तर आम्ही यायला तयार आहेत. खोल्या सॅनिटाईज नसतील तरी चालतील, असे खुले आव्हान सोमय्या यांनी राऊत यांना दिले. कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा रेटून धरली. घोटाळ्याच्या चौकशीची भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना वाटत आहे. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेसाठी लढणाऱ्याला 'ब्लॅकमेलर' म्हणणे चुकीचे आहे. तुमच्यामुळे कोव्हिड रुग्णांवर अत्याचार झाल्याचे सोमय्या म्हणाले.

पीएमसी घोटाळ्याशी दमडीचाही संबंध नाही!

पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी दमडीचा संबंध नाही. बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलत आहेत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही.उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला. डीएचएफल घोटाळा देखील आम्हीच बाहेर काढला. तरीही संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित कागदपत्रे असतील तर त्यांनी ईडीने एवढ्यावेळा बोलावे तेव्हाच द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात, असे सोमय्या म्हणाले.

जोडे नेमके कुणाला मारायचे आहेत?

रश्मी ठाकरे,मनिषा वायकर यांनी टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे.त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असे सोमय्या यावेळी म्हणाले. राऊत यांच्याकडून माझ्याबद्दल करण्यात आलेल्या आरोपांची खुशाल चौकशी करावे, असे आव्हान ही सोमय्या यांनी दिले. १९ बंगल्यावर घेवून जातो. बंगले दिसले नाही तर जोडे मारतो असे राऊत म्हणाले.पंरतु,ते जोडे नेमके कुणाला मारायचे आहेत? असा सवाल सोमय्यांनी विचारला. २०१३ ते २०२१ या काळात सगळा कर रश्मी ठाकरे यांनी भरला आहे. घर नाही तर घरपट्टी का भरतात? मला कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे सोमय्या म्हणाले. ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील त्यांनी यावेळी सादर केला.

घर नाही, हे नाटक कशाला?

रश्मी ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला कर भरला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही घरपट्टी भरली. ५.४२ लाख असे ग्रामपंचायतीने व्हॅल्युएशन दाखवले. २००८ मध्ये व्हिजीट करून घर बांधून झाली. एग्रीमेंट २०१४ मध्ये केले. मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हे २०२० ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा खोचक सवाल देखील सोमय्या यांनी राऊत यांच्याकडे उपस्थित केला.

दरवर्षी बंगल्याचा कर भरला गेला

१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे. ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसेच व्यावसायिक संबंध उघड केले होते.अन्वय नाईक यांनी २००८ मध्ये हे बंगले बांधले होते. हा ठाकरे सरकारनेच दिलेला रेकॉर्ड आहे.२००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे.आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या, असा आरोप सोमय्यांनी केला.आजपर्यंत उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. रश्मी ठाकरे बोलल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे बंगले चोरीला गेले की, ते खोटे बोलतात हे दोनच प्रश्न असल्याचे सोमय्या म्हणाले. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यासंदर्भात ग्रामपंयातीची माफी मागितली आहे.हे पत्र संजय राऊत यांच्याकडे असल्याचे सोमय्या म्हणाले. विशेष म्हणजे हे घर वनखात्याच्या जमिनीवर आहे.उद्धव ठाकरे यांच्यावर खुन्नस काढायची असेल तर किरीट सोमय्यांचा वापर कशाला करता ? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी राऊतांना केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news