Mumbai Police Promotion : मुंबईतील ११० पोलीस अधिकारी झाले एसीपी, वपोनि

अधिकार्‍यांना त्यांच्या नव्याने नियुक्ती केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश
Mumbai Police Promotion
Mumbai Police Promotionpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई पोलीस दलातील ११० पोलीस अधिकार्‍यांना सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यात अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर ९२ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बढतीनंतर या सर्व पोलीस अधिकार्‍यांची बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच अठराहून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. या पोलीस अधिकार्‍यांना त्यांच्या नव्याने नियुक्ती केलेल्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा गुरुवारी संपली. गुरुवारी अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त तर ९२ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती दिली आहे. या बढतीनंतर या सर्व पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.

ज्या अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांची दहिसर विभाग, जुहू पोलीस ठाण्याचे सुनिल जाधव यांची गोरेगाव विभाग, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे विलास दातीर यांची टिळकनगर विभाग, वडाळा पोलीस ठाण्याचे सुदर्शन होनवडजकर यांची मुलुंड विभाग, सांताक्रुज पोलीस ठाण्याचे योगेश शिंदे यांची अंधेरी विभाग, दादर पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्‍वर आवारी यांची वर्सोवा विभाग, माटुंगा पोलीस ठाण्याचे दादासाहेब घुटुकडे यांची साकिनाका विभाग, पायधुनी पोलीस ठाण्याचे विनोद गावकर यांची सांताक्रुज विभाग, खार पोलीस ठाण्याचे संजीव धुमाळ यांची संरक्षण व सुरक्षा, मुलुंड पोलीस ठाण्याचे अजय रामदास जोशी यांची भांडुप विभागात बदली करण्यात आली आहे.

Mumbai Police Promotion
Thanale- Nadsur Caves | वनौषधीच्या परिसरात ठाणाळे- नाडसूर लेणी

दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील अठरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या वरिष्ठ पोलीस निरीक्षकामध्ये शिवडी पोलीस ठाण्याचे रोहित खोत यांची विशेष शाखा एक, धारावी पोलीस ठाण्याचे राजू बिडकर यांची आझाद मैदान, पार्कसाईट पोलीस ठाण्याचे संतोष गाठेकर यांची मुलुंड, पवई पोलीस ठाण्याचे जितेंद्र सोनावणे यांची विशेष शाखा एक, विशेष शाखा एकचे कैलास आव्हाड यांची भोईवाडा, सशस्त्र पोलीस दलाच्या आशा कोरके, पद्माजी बनसोडे आणि आनंद भोईर यांची सशस्त्र पोलीस कोष, गुन्हे शाखेच्या अर्पणा जोशी यांची संरक्षण व सुरक्षा, गुन्हे शाखेच्या आत्माजी सावंत यांची पवई येथे बदली करण्आयात आली आहे.

आर्थिक शाखेचे शाखेचे नितीन उन्हवणे, नितीन पाटील यांची अनुक्रमे संरक्षण व सुरक्षा तर होनाजी लांडे आणि विजय चौरे यांची पूर्व नियंत्रक्षण कक्ष आणि शिवडी, वाहतूक विभागाचे नरेंद्र शिंदे व रजनी साळुंखे यांची वाहतूक, मुबारक फाहीम शेख यांची विशेष शाखा, जयवंत पवार यांची बांगुरनगर, कफ परेड पोलीस ठाण्याचे सतीश गायकवाड यांची सशस्त्र पोलीस कोष, कुर्ला पोलीस ठाण्याचे विकास म्हामुणकर यांची विशेष शाखा एक, माहीम पोलीस ठाण्याचे संजय पाटील यांची संरक्षण व सुरक्षा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रविंद्र वाणी यांची गुन्हे शाखा, डी. एन नगर पोलीस ठाण्याचे राजेंद्र मचिंछर यांची वाहतूक शाखा, वरळी पोलीस ठाण्याचे अरविंद पाटील यांची गुन्हे शाखा, मालाड पोलीस ठाण्याचे दुष्यंत चव्हाण यांची वाहतूक येथे बदली करण्यात आली आहे.

९२ पोलीस निरीक्षक झाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक

मुंबई पोलीस दलातील ९२ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर या सर्व पोलीस अधिकार्‍यांनी नव्याने बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकार्‍यांमध्ये मलबार हिल पोलीस ठाण्याचे भास्कर गोरवे यांची मलबार हिल, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे तुकाराम कोयंडे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, आंबोली पोलीस ठाण्याचे सुशीलकुमार गायकवाड यांची कुरार, तिलकनगर पोलीस ठाण्याचे मनिषा कुलकर्णी यांची चुन्नाभट्टी, संरक्षण व सुरक्षा विभागाच्या स्वाती पेटकर, शिवाजी रोहिदास जाधव यांची अनुक्रमे संरक्षण व सुरक्षा विभाग, डोंगरी पोलीस ठाण्याचे मनिाथ वाळेकर यांची विशेष शाखा एक, दादर पोलीस ठाण्याचे मिना जगताप यांची ताडदेव, आरे पोलीस ठाण्याचे राणी पुरी यांची विशेष शाखा एक, दहिसर पोलीस ठाण्याचे विवेक सोनावणे यांची एमएचबी, सपो मरोळ विक्रम चव्हाण यांची विक्रोळी येथे बदली करण्यात आली आहे.

भायखळा पोलीस ठाण्याचे नवनाथ घुगे यांची वाकोला, आर्थिक गुन्हे शाखेचे किरण शालीग्राम व दत्तात्रय मासवेकर यांची अनेक्रमे मेघवाडी व सांताक्रुज, वाहतूक शाखेचे राजेंद्र गोडसे यांची नागपाडा, विशेष शाखेचे फिरोजखान पठाण आणि सुजीत चव्हाण यांची अनुक्रमे नेहरुनगर व विशेष शाखा एक, विशेष शाखा एकचे समीर फनीबंद यांची विशेष शाखा एक, आरसीएफ पोलीस ठाण्याचे लोकेश कानसे यांची ट्रॉम्बे, वडाळा पोलीस ठाण्याचे विनोद काळेकर यांची सागरी दोन, गोरेगाव पोलीस ठाण्याचे अब्दुल शेख यांची वनराई, धारावी पोलीस ठाण्याचे अशोक उगळे यांची सागरी एक, जुहू पोलीस ठाण्याचे प्रविण पाटील यांची अंबोली, संरक्षण व सुरक्षा विभागाचे संजय पाटील यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, दहिसर पोलीस ठाण्याचे अशोक घुगे यांची सशस्त्र पोलीस कोष, सपो नायगाव कक्ष दहाचे विठ्ठल आर्डेकर यांची घाटकोपर येथे बदली करण्यात आली आहे.

एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे विजय दंडवते यांची एल. टी मार्ग, गुन्हे शाखेचे दिपक सावंत यांची भायखळा, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे सुरेखा घार्गे यांची माटुंगा, आर्थिक गुन्हे शाखेचे बिलाल अमरुद्दीन यांची मानखुर्द, विधानभवन सुरक्षाचे सुशील परब यांची विधानभवन सुरक्षा, वरळी पोलीस ठाण्याचे नितीन शिंदे यांची नवघर, डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे जितेंद्र कदम यांची मरिनड्राईव्ह, गुन्हे शाखेचे धनश्याम नायर यांची एमआयडीसी, बीकेसी पोलीस ठाण्याचे बालाजी दहिफळे यांची विशेष शाखा एक, सपो वरळीचे अमरीश पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, गुन्हे शाखेचे संदीप येडे-पाटील यांची गुन्हे शाखा, माटुंगा पोलीस ठाण्याचे वैभव पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, विशेष शाखा एकचे संजय ढोन्नर यांची विशेष शाखा एक, शिवाजीपार्क पोलीस ठाण्याचे प्रमोद पवार यांची शिवाजी पार्क येथे बदली करण्यात आली आहे.

Mumbai Police Promotion
Union Budget 2026: कोकणासाठी विकासाचा महासंकल्प; कृषी-मत्स्य-रेल्वे-बंदरांना ऐतिहासिक चालना

आर्थिक गुन्हे शाखेचे रमेश चांदीवडे यांची यलोगेट, मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्याचे शिवाजी पालांडे यांची सशस्त्र पोलीस कोष, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे नारायण पडवळ यांची आग्रीपाडा, काळाचौकी पोलीस ठाण्याचे सिमा गायकवाड यांची व्ही. पी रोड, वाहतूक शाखेचे कन्हैयालाल शिंदे यांची विमानतळ, बोरिवली पोलीस ठाण्याचे सचिन सस्ते यांची विशेष शाखा एक, आरसीएफ पोलीस ठाण्याचे मौसमी पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, साकिनाका पोलीस ठाण्याचे सपना क्षीरसागर यांची भांडुप, गुन्हे शाखेच्या रोहिनी पोतदार यांची गुन्हे शाखा, गुन्हे शाखेचे अजय कुलकर्णी यांची निर्मलनगर, मुख्य नियंत्रण कक्षाचे महेंद्र काळढोके यांची मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक विभागाचे आदिनाथ गावडे यांची काळाचौकी, विशेष शाखा दोनचे मोहीनी सोनार यांची विशेष शाखा दोन, गुन्हे शाखेचे मिलिंद कांटे यांची विशेष शाखा एक, सहार पोलीस ठाण्याचे बाबूराव गावडे यांची जुहू, वाकोला पोलीस ठाण्याचे अनिल मारुती यांची एमआरए मार्ग, गुन्हे शाखेचे सरीता गावडे यांची विशेष शाखा एक येथे बदली करण्यात आली आहे.

भांडुप पोलीस ठाण्याचे सिद्धेश्‍वर पुजारी, विशेष शाखोचे एकचे मधुकर साळुंखे, गुन्हे शाखेचे हेमंत कुडाळकर यांची अनुक्रमे यांची विशेष शाखा एक, चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे संतोष काटे यांची खार, खेरवाडी पोलीस ठाण्याचे सविता माळी यांची कांजूरमार्ग, मालवणी पोलीस ठाण्याचे मायदेवी दनके यांची उत्तर नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखेचे संजय तांदुळवाडकर यांची संरक्षण व सुरक्षा, गुन्हे शाखेचे किरण जाधव यांची दक्षिण नियंत्रण कक्ष, आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास लोकरे यांची मालाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भगवान बेले यांची संरक्षण व सुरक्षा, आर्थिक गुन्हे शाखेच्या पुष्पलता मंडले यांची बोरिवली, विशेष शाखा दोनचे ममता नंदागवळी आणि मेघा इंगुले यांची विशेष शाखा दोन, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे धनंजय शिंदे यांची शिवाजीनगर, सशस्त्र पोलीस कोष-नायगावचे अभिषेक डाके यांची सशस्त्र पोलीस कोष, वाहतूक विभागाच्या जयश्री जयकर यांची सशस्त्र पोलीस कोष, विशेष शाखा एक आणि दोनचे कमल ननावरे, पांडुरंग सावंत यांची विशेष शाखा एक आणि दोन, सहार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय सोयसकर यांची धारावी येथे बदली करण्यात आली आहे.

जोगेश्‍वरी पोलीस ठाण्याचे अर्चना पाटील यांची सशस्त्र पोलीस कोष, सर जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पवार यांची संरक्षण आणि सुरक्षा, पंतनगर पोलीस ठाण्याचे चंद्रकांत अहिरे यांची विशेष शाखा एक, एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे विलास राठोड यांची कुर्ला पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे किशोर पवार यांची माहीम, वाहतूक विभागाच्या जयश्री मलावत यांची संरक्षण व सुरक्षा, डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे सागर तिळेकर यांची डोंगरी, विशेष शाखा दोनचे संभाजी काळे यांची विशेष शाखा दोन, संरक्षण व सुरक्षा विभागाचे अमीत ताड यांची व्ही. बी नगर, संरक्षण व सुरक्षा विभागाचे महेश वळंवतराव यांची चारकोप, संरक्षण व सुरक्षा विभागाचे विनोद गायकवाड यांची कफ परेड, गुन्हे शाखेचे सचिन गवस यांची डी. एन नगर पोलीस ठाणे, सपो मरोळचे पोलीस निरीक्षक तात्याबा पारधी यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

दुसरीकडे पालघरचे अविनाश मांदळे यांची साकिनाका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत पाडावे यांची वडाळा, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे धिरज कोळी, बाळकृष्ण धाडीगावकर, बाळासाहेब बनकर, दुर्गा चौधरी, आनंद पेडणेकर यांची अनुक्रमे विशेष शाखा एक, दादर व कस्तुरबा मार्ग, पश्‍चिम नियंत्रण कक्ष, सशस्त्र पोलीस कोष, पिंपरी-चिंचवडचे महदेव कोळी यांची विशेष शाखा एक, पुण्याचे मंगेश हांडे, अशोक इप्पर यांची अनुक्रमे वरळी व सशस्त्र पोलीस कोष, दहशतविरोधी पथकाचे प्रशांत मोहिते यांची गावदेवी, विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विजय लांडगे यांची विशेष शाखा एकमध्ये बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news