बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरी भागापेक्षा मतदानाचा टक्का हा ग्रामीण भागात चांगला असतो. त्यात जर ग्रामपंचायतीचे मतदान असेल तर वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानाला नेऊन त्याचे मतदान केले जाते. ग्रामीण भागात मतदानाच्या बाबतीत मतदार जागरूक असतो. केज तालुक्यातील साळेगांव येथे लग्न होताच नवरा नवरीची वरात बुलेटवरून थेट मतदान केंद्राच्या दारात पोहीचली. त्यांनी गावच्या निवडणुकीत मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य निभावले.
साळेगांव (ता केज) येथील संजय दादाराव कळसकर यांचे चिरंजीव रामेश्वर उर्फ नामू यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील वासुदेव भगवान राशकर यांची कन्या वैष्णवी हिच्याशी दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी पार पडला. लग्न पार पडताच त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतादानाचा हक्क बजावला. साळेगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.