लातूर : 85 वर्षांच्या आजीने केला ओला सुका कचरा वेगळा

लातूर : 85 वर्षांच्या आजीने केला ओला सुका कचरा वेगळा

चाकूर, पुढारी वृत्तसेवा :शहरातील 85 वर्षाच्या आजीने युवा पिढीतील तरुण युवक युवतींना मागे टाकून कचर्‍याचे विलगीकरण करुन ओला व सुका कचरा वेगळा करून दाखविला आहे. यानिमित्त राष्ट्रीय कार्यात आजीबाई सहभागी असल्याचा अनुभव नुकताच चाकूरकरांना आलेला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा सहआयुक्त यांच्या सुचने प्रमाणे 22 ऑगस्टपासून सुरू झालेल्या घनकचरा सप्ताह व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी चाकूर शहर कचरा मुक्त करण्याच्या उद्देशाने शहरातील घनकचरा व्यवस्थापनची पाहणी करण्यात आली. चाकूर शहर 'कचरा मुक्त' करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व न.पं.चाकूर यांच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी शहरात कचरा व्यवस्थापनासाठी पाहणी करताना त्यांच्या समोरच 85 वय असलेल्या जनाबाई गोलावार या आजीने स्वतःला डोळ्याने कमी दिसत असताना तिने योग्य प्रकारे ओला सुका कचरा वेगवेगळा केलेला पाहिला. लगेचच आजीबाईंची भेट घेऊन सत्कार केला.

यावेळी चाकूरच्या जनतेने आजी जनाबाई गोलावार यांचा आदर्श घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी रणदिवे यांनी केले. ओला व सुका कचरा वर्गीकरण 'वेंगुर्ला पॅटर्नच्या' धर्तीवर राबवण्यात येत असून शहर 'कचरा मुक्त' करण्यासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नागरिक व नगरपंचायत कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news