बीड : गेवराईत सरपंच निवडीवेळी मारामारी

File Photo
File Photo

गेवराई ः पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील सिरसमार्ग येथील सरपंच उपसरपंच निवडीला हिंसाचाराचे गालबोट लागले असून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सिरसमार्ग येथील सरपंच, उपसरपंचांची निवड गुरुवारी होणार होती. या निवडीत काही सदस्यांनी दुसर्‍या गटाला मदत केल्याने वाद झाला. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांनाही मारहाण झाली.

दरम्यान सिरसमार्गच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सीमा सुरेश मार्कड यांची बिनविरोध निवड झाली उपसरपंचपदी भाजपच्या मेघा पवळ यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांचा एक मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे एक मत फुटले या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा तर भाजपचे पाच जागा आहेत. सदरील प्रकरणाचा तपास प्रफुल्ल साबळे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news