

लेंडी नदीला पूर आला असून मांगणी ला पूर आल्याने पात्राबाहेर पाणी वाहत असल्याने लेंडी नदीचे पाणी हे नालेवाडी येथील गणपतनगर झोपडपट्टीत शिरले असून १५० घरात पाणी शिरून घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. आता झोपडपट्टी येथील नागरिकांना रात्र पाण्यात काढावी लागणार असे विदारक चित्र आहे.
अंबड तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचे रौद्र रूप धारण केले असून मंगळवारी पडलेल्या पावसाने पुन्हा ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा नालेवाडी येथील लेंडी नदीला पूर आल्याने नदी जवळील झोपडपट्टी गणपतनगर येथील १५० घरे पाण्यात गेली आहे.त्या भागात घरा दारात गुडघ्या इतके पाणी झाले असून खळखळ पाणी वाहत आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून रात्र कुठं काढायची असा प्रश्न या नदीकडेच्या नागरिकांना पडला आहे.
नालेवाडी झोपडपट्टी जलमय झाली असून लेंडी नदीचे पाणी मांगणी नदीला मिळते मात्र मांगणी नदीच्या पात्राबाहेर पाणी चालल्याने पूर्ण लेंडी नदीचे पाणी हे नालेवाडी गणपतनगर झोपडपट्टीत घुसले असून त्या १५० घरात पाणी शिरून सर्व संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. भयंकर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.